पुणे : क्लब कानसेनतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारी ‘थाटरंग’ मैफलीचे आयोजन करण्यात आले असून या मैफलीत संगीतकार, ज्येष्ठ शास्त्रीय गायक हेमंत पेंडसे आणि त्यांच्या शिष्यवर्गाचे गायन होणार आहे.
कार्यक्रम रविवार, दि. 9 जुलै रोजी सकाळी 8 वाजता क्षिप्रा सहनिवास सोसायटीचे सभागृह, कर्वेनगर येथे होणार आहे. कलाकारांना शुभांगी भावसार, एकनाथ जोशी, मीनल दांडेकर, समीर मोडक, स्वानंद कुलकर्णी, पुष्कर महाजन साथसंगत करणार असून प्राची नारकर, अनुष्का नाईक, साक्षी गुलवानी निवेदन करणार आहेत.
राधिका ताम्हनकर यांना मोरेश्वर यशवंत कुलकर्णी स्मृती युवा पुरस्कार
दुबई येथील संगीतप्रेमी रसिक श्रीरंग कुलकर्णी यांच्या वतीने कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी स्मृती युवा पुरस्कारासाठी राधिका ताम्हनकर यांची निवड करण्यात आली आहे. अकरा हजार रुपये रोख, श्रीफळ व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कराचे यंदाचे चौथे वर्ष आहे. रविवारी (दि. 9) आयोजित करण्यात आलेल्या ‘थाटरंग’ कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे.