
भावा सारखा तुमच्या पाठीशी उभा राहील
आयुक्त शेखर सिंह यांनी तृतीय पंथीयांबरोबर साजरे केले रक्षाबंधन
पिंपरी
मी भावासारखा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन शेखर सिंह यांनी तृतीय पंथीयांना दिले.
आज आयुक्त शेखर सिंह यांनी तृतीयपंथीयांच्या बरोबर रक्षाबंधन साजरे करत एक अनोखा उपक्रम राबविला. नारी द वुमन संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांच्या या उपक्रमाचे पिंपरी चिंचवड महापालिकेत खूपच स्वागत व कौतुक करण्यात आले.
यावेळी तृतीयपंथीयांशी बोलत असताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले की आपल्याला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असेल त्याचबरोबर शहरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये तृतीय पंथीय रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था सुरू केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नारी द वुमन संस्थेचे अध्यक्ष अर्चना मेंगडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त रविकिरण घोडके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.