पिंपरी, दि. ११ ऑक्टोबर २०२३ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ४१ व्यां वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आणि शिबिरांचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगर पलिके मार्फत करण्यात आले होते.
आयुक्त थिरकले कर्मचाऱ्यां सोबत
आयुक्त शेखर सिंह बेभान होऊन कर्मचाऱ्यां सोबत नाचताना दिसले तसेच संगीत खुर्ची असेल रस्सी खेच असेल किंवा मग गाण्यांचा कार्यक्रम असेल प्रत्येक ठिकाणी आयुक्त शेखर सिंह कर्मचाऱ्यां सोबत एक दिलाने सहभागी झाले होते. आयुक्त आपल्या सोबत हातात हात घालून नाचत असल्याने कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता, कर्मचारी आयुक्तांकडे अवाक होऊन बघत होते. त्यामुळे सर्वत्र जिंदादिल आयुक्तांचीच चर्चा सुरू होती. सकाळ पासूनच अत्यंत चैतन्य पूर्ण वातावरण दिसत होते, सगळे जण रंगे बिरंगी पोशाख परिधान करून सगळ्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होत होते.
विविध सांस्कृतिक, क्रिडाविषयक कार्यक्रमांचा आनंद घेत असताना रक्तदान शिबीरात भाग घेऊन सामाजिक कार्यात हातभारही लावला.
प्रारंभी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार महेश लांडगे आणि आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सातारा येथील सनदी अधिकारी एस.झेनिथ,अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम,उप आयुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात महापालिकेच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या अधिकारी कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले तसेच रक्ताचा एक थेंब जीवनदान देण्यात किती महत्वाचा आहे याचे महत्वही त्यांनी पटवून दिले.
दरम्यान, महिलांसाठी खास न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच पाक कला व फँन्सी ड्रेस, रांगोळी स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तळ मजल्यावर उद्यान विभागाच्या वतीने विविध झाडांच्या एकत्रीकरणाने आकर्षक बाग तयार करण्यात आली असून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.