पिंपरी,(हॅलो महाराष्ट्र न्यूज) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शारीरिक दृष्ट्या अपंग (दिव्यांग) असलेले मतदार व ज्यांचे वय ८५ वर्षे पेक्षा जास्त मतदार आहे. अशा मतदारांसाठी गृहमतदान प्रक्रिया रावबिण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. त्यानुसार बुथ स्तरीय अधिकारी यांचे मार्फत घरोघरी सर्व्हेक्षण करून इच्छुक मतदाराकडुन १२ड अर्ज भरण्यात आलेले आहेत.
सदर अर्जाची छाननी करून ३४ पैकी ५ दिव्यांगासह पात्र मतदारांसाठी टपाली मतपत्रिका तयार करणेत आलेल्या आहेत. यासाठी गृहमतदान प्रक्रिया करणेसाठी मतदारांचे प्रत्यक्ष घरी जाऊन टपाली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणेकामी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापथकामध्ये सेक्टर ऑफीसर, पर्यवेक्षक, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलिस अधिकारी/कर्मचारी, सुक्ष्म निरिक्षक, बीएलओ,व्हीडीयो ग्राफर, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर पथकात नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांनी दिनांक ०७ मे २०२४ ते ०८ मे २०२४ रोजी (दोन दिवस) सकाळी ०७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत होणार आहे याबाबतची पुर्व कल्पना संबधीत मतदार यांना लेखी स्वरूपात दिलेली आहे मा. भारत निवडणूक आयोग यांचेकडील मार्गदर्शक सूचनाप्रमाणे गोपनियतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन मतदान प्रक्रिया राबविणेत येणार असलेचे पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे. गृहमतदान प्रक्रियेसाठी मनोहर जावरानी यांची नोडल ऑफीसर म्हणुन नेमणुक करणेत आलेली आहे.