– शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे यांची उपस्थिती
पिंपरी, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार, दिनांक 11 मे 2024 रोजी चिंचवड विधानसभा क्षेत्रात भव्य दुचाकी व चारचाकी रॅली काढण्यात येणार आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.
या रॅलीची सुरुवात शनिवार, दिनांक 11 मे 2024 रोजी सकाळी साडेआठ वाजता किवळेगाव चौक येथून होणार आहे. पुढे मुकाई चौक – शिंदे पेट्रोल पंप- विकासनगर – आदर्शनगर – मोरेश्वर भोंडवे निवास – शिंदे वस्ती – भोंडवे कॉर्नर – आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज – धर्मराज चौक – गुरुव्दारा चौक – वाल्हेकरवाडी चौक – डांगे चौक – काळाख़डक – वाकड – दत्त मंदिर रो़ड – पोलिस लाईन – अॅबियन्स हॉटेल – काळेवाडी फाटा – पिंपळे निलख – पिंपळे सौदागर – शिवार चौक – नाना काटे ऑफिस – रहाटणी फाटा – पाचपीर चौक मार्गे रॅलीचा समारोप ज्योतिबा मंगल कार्यालय येथे होणार आहे.
उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासोबत उपनेते व व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील या रॅलीमध्ये सहभागी होतील. त्यांच्यासोबक पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील शिवसेनेसह सर्व घटक पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.