पिंपरी, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी (दि.१३) रोजी सकाळी ७.४५ च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला.
पिंपरी वाघेरे येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय या केंद्रावर संजोग वाघेरे पाटील यांनी कुटुंबासोबत मतदान केले. संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत पत्नी उषा वाघेरे, पुत्र ऋषिकेश वाघेरे यांच्यासमवेत मतदान केले.