पिंपरी, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – बहुप्रतीक्षित अशा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. २० नोव्हेंबर २०२४ ला राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तारखांची घोषणा केली.
निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासोबत आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचीही घोषणा केली.
निवडणूक आयोगाला २६ नोव्हेंबर २०२४ पूर्वी निवडणुका घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान पर पडेल. तर २३ नोव्हेंबरला मराहाष्ट्रातील जनता महायुतीला निवडते की महाविकास आघाडीला याचा निकाल लागेल.
प्रचार तोफा कधी थंडावणार?
निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावतील.