पिंपरी (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – पिंपरी न्यायालयाचा ३५ वा वर्धापनदिन आणि जागतिक महिलादिन सन्मानसोहळा संपन्न शुक्रवार, दिनांक ०८ मार्च २०२४ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयाचा ३५वा वर्धापनदिन आणि जागतिक महिलादिन सन्मानसोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. सचिन थोपटे होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून बार कॅान्सिल ॲाफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, माजी नगरसेविका ॲड. उर्मिला काळभोर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यावेळी बारच्या वतीने सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला; तसेच पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वकिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन,बुद्धिबळ आणि इतर खेळांचा समावेश होता. स्पर्धेमधील विजेत्यांना
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यंदाचा यंग ॲडव्होकेट इन्स्पिरेशन अवॉर्ड ॲड. नरेश शामनानी, ॲड. अतिश लांडगे यांना देण्यात आले. सर्व महिला वकिल यांना कार्यकारिणीच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
वकिलांसाठी मनोरंजनाची आणि भोजनाची व्यवस्था बार असोशिएशनच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले पाटील, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, खजिनदार ॲड. अजित खराडे, ॲाडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. अय्याज शेख, ॲड. फारूख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. मीनल दर्शले, ॲड. स्वाती गायकवाड, ॲड. अस्मिता पिंगळे यांनी केले, तर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले.