पिंपरी, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – जागतिक महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण व उन्नती साठी भाजपा महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहराध्यक्ष शंकर जगताप व महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड येथे फोर व्हीलर ड्रायव्हिंग क्लासेस शुभारंभ सुरेश शिवाजी भोईर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या मार्गदर्शनात महिला मोर्चा उपाध्यक्ष दिपाली कलापुरे व महिला मोर्चा सचिव पल्लवी पाठक यांच्या वतीने करण्यात आले यासाठी सुरभी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या मालक (भाजपा महिला उद्योग आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) नीता कुशारे यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी सोना गडदे सरचिटणीस ओबीसी तसेच महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये शहरातील बहुतांश महिलांनी यामध्ये नोंदणी केलेली आहे.