पिंपरी, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या निगडी- प्राधिकरण सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे केली जाणार आहेत. तसेच, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणीही देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (ता. ३०) शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमीत वेळेनुसार होईल. मात्र, सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.